कर्ज घेण्याचा विचार करताय? ''या'' गोष्टी नक्की वाचा

घर घेण्यापासून ते मोबाईल खरेदी करण्यापर्यंत बहुतांश लोक कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित कंपन्या विविध ऑफर्स देतात

घाई गडबडीत कर्ज घेण्यास अनेकदा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते

जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ''या'' गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत

कर्ज घेण्यापूर्वी संबंधित कंपनीची माहिती घेणे महत्त्वाचे आहे

कर्ज देण्यापूर्वी जर कंपनीने अ‍ॅडव्हान्समध्ये पैसे मागितले तर तो स्कॅम असू शकतो

कर्ज घेण्यासाठी कंपनी दबाव आणत असेल तर तो नक्कीच धोक्याचा इशारा आहे

अतिशय कमी व्याजदर किंवा अविश्वसनीय ऑफरवर लगेच विश्वास ठेवू नका

कोणत्याही कंपनीला स्वत:ची वैयक्तिक माहिती, पिन किंवा ओटीपी देणे टाळावे

(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)