हे आहेत पत्नीच्या नावावर घर घेण्याचे फायदे

पत्नीच्या नावावर मालमत्ता नोंदणी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सूट मिळते

अनेक राज्यात महिलांसाठी स्टॅम्प ड्युटी एक ते दोन टक्क्यांनी कमी आहे

उदा. मुंबईमध्ये पुरुषांसाठी सहा तर महिलांसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त चार टक्के आहे

50 लाखांच्या घरावर महिलांना गृह खरेदीच्या नोंदणीमध्ये सुमारे एक लाखांची बचत होऊ शकते

महिलांच्या नावावर घर असल्यास गृहकर्जावर अतिरिक्त करसूट मिळते

कलम 80क अंतर्गत विशिष्ट वित्तीय साधनांमध्ये गुंतवणुकीसाठी दरवर्षी दीड लाखांपर्यंतची वजावट मिळते

कलम 24नुसार व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे

पती-पत्नी जर घराचे सहमालक असतील तर गृहकर्जाच्या व्याजावर दोघांना दुहेरी करसूट मिळू शकते

अनेक बँका महिलांना गृहकर्जावर 0.05 ते 0.1 टक्क्यांपर्यंत कमी व्याजदर देतात

कमी व्याजदरामुळे दीर्घकालीन कर्जावर लाखो रुपयांची बचत होऊ शकते

प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत महिलांना घर खरेदीवर 2.67 लाखांपर्यंत अनुदान मिळते

सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये महिलांना अनेक फायदे मिळतात

नोंदणी आणि कर्ज अर्जात महिलेचे नाव समाविष्ट केल्यास महिलांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळतो