हिवाळ्यात लग्नासाठी ''या'' पद्धतीने करा स्वत:चा मेकअप

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पार पडतात

थंडीमुळे त्वचेतील ओलावा पटकन कमी होतो, अशा वातावरणात मेकअप टिकून रहावा यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे

हिवाळ्यात पार पडणाऱ्या लग्न समारंभांमध्ये आपण सर्वात जास्त सुंदर दिसावं, अस सर्वांनाच वाटतं

यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे

हिवाळ्यात त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी ''या'' गोष्टी वापरा

मॉइश्चरायझर लावा: आंघोळ केल्यानंतर त्वरित मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ, तजेलदार आणि दिवसभर ओलसर राहते

हाइड्रेटिंग प्राइमर: हिवाळ्यात हायड्रेटिंग प्राइमर लावल्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि मेकअप अधिक स्थिर राहतो

हायडेफिनेशन मेकअप: हिवाळ्यात हायडेफिनेशन मेकअप केल्याने त्वचेला एक नैसर्गिक लुक मिळतो

ओठांसाठी लिपबाम: हिवाळ्यात ओठांना लिपबाम लावल्याने ओठ मुलायम राहतात

हायड्रेटिंग स्प्रे: मेकअप दिवसभर टिकून राहण्यासाठी आणि तो सेट होण्यासाठी हायड्रेटिंग सेटिंग स्प्रेचा वापर करा

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)