हिवाळ्यात कमी प्रमाणात पाणी पिताय? ''या'' गोष्टींची खबरदारी घ्या
उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो, कोणत्याही ऋतुंमध्ये शरीरासाठी पाणी आवश्यक असते
परंतु थंडी वाढली की तहान लागण्याचे प्रमाण कमी होते
कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डिहायड्रेशन होऊ शकते
शरीरात 60 ते 70 टक्के पाणी असतं, मात्र शरीरातून अडीच लिटर पाणी बाहेर पडते
यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि डिहायड्रेशनचा धोका संभवतो
कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने थकवा जाणवतो
हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते
डिहायड्रेशनमुळे मेंदूवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता वाढते
डिहायड्रेशनमुळे रक्ताचा पुरवठा कमी होऊन ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवर ताण येऊन स्टोन किंवा इन्फेक्शनचा धोका निर्माण होतो
दररोज किमान दोन ते अडीच लिटर पाणी प्यायल्याने चयापचय सुधारण्यास मदत होते
निरोगी राहण्यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत थोडं-थोडं पाणी पिण्याची सवय ठेवा
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)