हिवाळ्यात तोंडातून वाफ का येते?

हिवाळा सुरू होताच अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळते

विशेष म्हणजे, हिवाळ्यात श्वास सोडताना अनेकांच्या तोंडातून वाफ बाहेर पडते

मात्र हिवाळ्यात श्वास सोडताना तोंडातून वाफ का बाहेर पडते? हा प्रश्न अनेकांना पडतो

श्वास घेताना शरीरात ऑक्सिजन जातो आणि श्वास सोडताना CO2 बाहेर पडतो

यादरम्यान आपल्या श्वासात काही प्रमाणात नैसर्गिक ओलसरता म्हणजेच वॉटर वेपरही असते

श्वासातील ही ओलसर हवा बाहेर पडून थंड हवेत मिसळते

थंड तापमानामुळे ही ओलसरता लहान पाण्याच्या थेंबांमध्ये रुपांतरित होते

हे थेंब एकत्र जमा झाल्यावर वाफेत रुपांतरित होतात

ही प्रक्रिया थंड बाटलीवर तयार होणाऱ्या पाण्याच्या थेंबांसारखीच असते

तोंडातून वाफ बाहेर पडताना दिसणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण नाही

जर तापमान सात डिग्री सेल्सियसच्या खाली गेले, तर वाफ अधिक स्पष्ट दिसते

अत्यंत थंड प्रदेशातही वाफ बर्फाच्या कणांमध्येही बदलू शकते

त्यामुळे हिवाळ्यात तोंडातून वाफ बाहेर पडताना दिसणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)