जगभरात पुरुष दिन का साजरा केला जातो?

जगभरात महिलांप्रमाणेच पुरुष दिनही साजरा करण्यात येतो

19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो

पुरुषांच्या योगदानाकडे समाजाचे लक्ष वेधणं, हाच याचा हेतू

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात 1999 मध्ये झाली

त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे या दिवसाची मुहूर्तमेढ रोवली गेली

वेस्ट इंडीज विद्यापीठातील प्रा. डॉ. जेरोम टीलकसिंग यांची ही संकल्पना

पुरुष दिन साजरा करण्यामागील अतिशय विशेष कारण आहे

डॉ. जेरोम यांच्या वडिलांचा 19 नोव्हेंबरला वाढदिवस असतो

यानिमित्तानेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यासाठी निवडला

तेव्हापासून अनेक देशात 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो