एलपीजी गॅसमधून वास येत असल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

घराघरात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो

गॅसमुळे जेवण बनवणं अगदीच सोपं झालं आहे

पण याचे काही दुष्परिणामदेखील आहेत, त्यातील एक म्हणजे गॅस सिलेंडरला गळती लागली तर?

स्वयंपाकघरात एलपीजी गॅसचा वास आला तर, या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

परंतु गॅस गळती ओळखण्यासाठी त्यात ''इथाइल मर्कॅप्टन'' नावाचे रसायन मिसळले जाते, ज्यामुळे कुजलेल्या अंड्यांसारखा किंवा लसणासारखा वास येतो

एलपीजी गॅसमधून ''इथाइल मर्कॅप्टन'' नावाच्या रसायनाचे वास येणे हे गॅस गळतीचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे

जर स्वयंपाकघरातून एलपीजी गॅसचा वास येत असेल तर बर्नर आणि रेग्युलेटरचे नॉब लगेच बंद करा

एलपीजी गॅसचा वास आल्यास घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या त्वरित उघडा

गॅस गळतीचा वास आल्यास घरातील मेणबत्या, अगरबत्ती, यासारख्या ज्वलनशील पदार्थ त्वरीत विझवा

शक्य असल्यास सिलेंडर हवेशीर ठिकाणी ठेवा

गॅस गळतीचा वास आल्यास, त्वरित घरातून बाहेर पडा

एलपीजी गॅसला आग लागल्यास तुम्ही भिजवलेले जाड ब्लँकेट सिलेंडरभोवती गुंडाळून आग कमी करू शकता