नॉमिनी आणि लाभार्थीमधील ''हा'' फरक तुम्हाला माहित आहे का?

बँकेत खातं उघडताना, मालमत्ता खरेदी करताना किंवा विक्री करताना अनेक प्रक्रिया केल्या जातात

त्यातील एक प्रक्रिया म्हणजे नॉमिनी किंवा लाभार्थी जोडणे

पण अनेकदा नॉमिनी व लाभार्थी एकच असल्याचे अनेकांना वाटते

तर आता आपण या दोन्हीमधील नेमका फरक काय आहे? ते समजून घेऊया

नॉमिनी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा दावा करण्यासाठी नियुक्त केली जाते

कायदेशीर वारसांच्या परवानगीशिवाय नॉमिनी मालमत्तेचे हस्तांतरण करू शकत नाही

लाभार्थी म्हणजे या व्यक्तीला इच्छापत्रानुसार मालमत्ता होते

इच्छापत्रामध्ये मृत व्यक्तीच्या इस्टेटमधून पैसे आणि मालमत्ता मिळवण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला लाभार्थी म्हणतात

उदा. मालमत्तेचे कायदेशीर वारसदार म्हणून मुलाला किंवा मुलीला घोषित केले, तर ते खरे लाभार्थी ठरतील

पण जर मुलगा किंवा मुलगी नसेल तर मित्र किंवा संस्था यांनाही लाभार्थी म्हणून घोषित केले जाऊ शकते