झोपण्यापूर्वी अनेकांना तोंडावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय असते
काहींना तर तोंडावर पांघरूण घेतल्याशिवाय झोपही लागत नाही
डॉक्टरांच्या मते, ही सवय तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते
तोंडावर पांघरूण घेऊन झोपण्याचे कोणते तोटे आहेत? पाहूयात
तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याने शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही
याउलट, तुमच्या श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड आतच अडकतो
ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आणि थकवा जाणवू शकतो
पांघरूणाने संपूर्ण शरीर झाकल्याने शरीराचे तापमान वाढते, उष्णता वाढते, ज्यामुळे घाम येतो आणि अस्वस्थता वाढते
तोंडावर पांघरूण घेतल्यामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही
झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड आणि मूड स्विंग्स होऊ शकतात
चेहरा झाकून झोपल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो
ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्या आणि काळे डाग वाढू शकतात
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)