फोन चार्ज करताना ''या'' चुका करू नका
अनेकांना रात्रभर फोन चार्जिंगला ठेवून झोपण्याची सवय असते
पण तुम्हाला माहीत आहे का? ही सवय धोकादायक ठरू शकते
फोन रात्रभर चार्जिंगला ठेवल्याने मोबाईलच्या स्फोट होण्याची शक्यता वाढते
फोनची बॅटरी लिथियम-आयर्नपासून बनलेली असते
तज्ञांच्या मते, लिथियम-आयर्न बॅटरीला पूर्ण 100 टक्के चार्ज करणे धोकादायक ठरू शकते
एका संशोधनात असे आढळून आले आहे की फोनला 100 टक्के चार्ज करणे टाळावे
फोनला 100 टक्के चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते
म्हणूनच बॅटरी 80 टक्क्यांपर्यंतच चार्ज करण्याचा प्रयत्न करा
फोन चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर केल्यास मोबाईलचे नुकसान होण्याची शक्यता असते
त्यामुळे फोन चार्ज करण्यासाठी तुमचा ओरिजिनल चार्जर वापरा