दिल्ली बॉम्ब बास्टमध्ये थ्रीमा अ‍ॅपचा झाला होता वापर?

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी मोठा बॉम्ब स्फोट झाला

संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांनी थ्रीमा अ‍ॅपचा वापर केल्याची माहिती समोर येते

हा स्फोट घडवण्यासाठी दहशतवाद थ्रीमा अ‍ॅपमधून संवाद साधत होते, असे सांगितले जाते

हे अ‍ॅप भारतामध्ये बॅन आहे

हे अ‍ॅप कशाप्रकारे काम करते पाहुयात

वापरकर्त्यांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी थ्रीमा अ‍ॅप एक काल्पनिक आयडी तयार करते

इच्छुक वापरकर्ते त्यांचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल त्यांच्या इच्छेनुसार अ‍ॅपमध्ये सेव्ह करू शकतात

थ्रीमा हे पेड अ‍ॅप असून पेमेंटसाठी खास सुविधा उपलब्ध आहेत

कायदेशीर ट्रॅकिंग टाळण्यासाठी काही वापरकर्ते रोख रकमेने पेमेंट करतात

स्वित्झर्लंडमधील चुरेरस्ट्रास येथील कार्यालयात कुरिअरद्वारे रक्कम पाठवता येते

यासोबतच, कायदेशीर ट्रॅकिंग टाळण्यासाठी बिटकॉइन पेमेंटही उपलब्ध आहे

वापरकर्ते एकमेकांचे QR कोड स्कॅन करून एकमेकांशी संपर्क साधू शकतात

चॅटिंगसह थ्रीमा अ‍ॅपवर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा आहे

हे अ‍ॅप भारतात बॅन असल्याने काही वापरकर्ते VPN चा वापर करून अ‍ॅप वापरण्याचा प्रयत्न करतात