जगातील ''या'' सर्वाधिक धोकादायक ठिकाणांबद्दल तुम्हाला माहित आहे का?
जगाच्या कोपर्यात अनेक ठिकाणं आहेत जी अत्यंत धोकादायक आहेत
या ठिकाणी मानवालाच प्रवेशबंदी आहे
स्नेक आयलंड: या बेटाचे दुसरे नाव इल्हा दा क्विमाडा ग्रांडे आहे, हे ठिकाण ब्राझिलमध्ये आहे
या बेटावर विविध प्रजातींचे अत्यंत विषारी साप आढळतात
उत्तर सेंटिनेल आयलंड: हे बेट भारतातील अंदमान बेटांपैकी एक आहे, येथे सेंटिनेलीज आदिवासी राहतात
ही जमाती बाहेरील लोकांना धोका मानते, त्यामुळे पर्यटकांवर हल्ला होण्याचा धोका असतो
दानाकिल डिप्रेशन: इथिओपियातील हे ठिकाण पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे
दानाकिल डिप्रेशन येथील तलावांमध्ये आम्ल (Acid) आणि विषारी वायू असल्यामुळे हा परिसर जीवघेणा ठरू शकतो
डेथ व्हॅली: हे ठिकाण अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि नेवाडा राज्यांच्या सीमेवर आहे
येथील तापमान 54 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते
माउंट एव्हरेस्ट: माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत आहे, येथे हिमस्खलनाचा मोठा धोका असतो
येथे ऑक्सिजनची प्रचंड कमतरता जाणवते