भारतातील सर्वात थंड हवेची ठिकाणे

भारतात विविध ऋतू अनुभवायला मिळतात

भारतातील काही भागात उष्ण तर थंड हवामान असते

भारतातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण कुठे आहेत? पाहुयात

सियाचिन ग्लेशियर: हे ठिकाण हिमालयाच्या पूर्वेला असलेल्या काराकोरम पर्वतरांगांवर आहे

सियाचिन ग्लेशियरवरील कमाल तापमान -10 डिग्री आणि किमान तापमान - 50 पर्यंत असते

ड्रास, लडाख: भारतातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण लडाखमधील ड्रास हे आहे

हिवाळ्यात ड्रास येथील तापमान -45 डिग्रीपेक्षा खाली जाते

लेह, लडाख: लेह हा भारतातील एक थंड वाळवंट प्रदेश आहे

समुद्रसपाटीपासून सुमारे 11 हजार 500 फूट उंचीवर लेह वसलेले आहे

स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश: स्पिती व्हॅली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते

हिवाळ्यात, स्पिती व्हॅलीवरील तापमान -30 डिग्रीपर्यंत जाते

​कीलाँग​: कीलाँग हे हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे

कीलाँग हे समुद्रसपाटीपासून 10 हजार 100 फूट उंचीवर आहे

कीलाँगमधील कमाल तापमान -2 डिग्री आणि किमान तापमान -11 डिग्रीपर्यंत असते