पर्यटकांसाठी खुश खबर! भारतातील ''या'' राज्यात आहे सर्वात लांब काचेचा स्कायवॉक

पर्यटकांसाठी भारतात सर्वात मोठा स्कायवॉक खुला करण्यात आला आहे

भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक विशाखापट्टणममधील कैलाशगिरी टेकडीवर आहे

तेलुगू देशम पार्टीचे (TDP) खासदार भरत यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी स्कायवॉक ब्रिजचे उद्घाटन केले

या स्कायवॉकची लांबी 55 मीटर असून तो इतर काचेच्या स्कायवॉकपेक्षा मोठा आहे

या प्रकल्पावर एकूण 7 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे

या स्कायवॉकवरून पर्वत, दऱ्या आणि समुद्राचं सुंदर दृष्य पाहायला मिळते

हा स्कायवॉक ताशी 250 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यालाही सहन करण्याची क्षमता ठेवतो

उद्घाटनानंतर पुलावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळली आहे