स्वच्छ आणि सुगंधित घर आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते
सुगंधित वातावरणमुळे घरात येणाऱ्या पाहुण्यांवर सकारात्मक परिणाम होतो
रासायनिक फ्रेशनर्सचा सुगंध आरोग्यासाठी खूप घातक असतो
घराचा सुगंध जास्त काळ टिकवण्यासाठी नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात
लिंबू आणि लवंग ठेवल्याने घरामध्ये नैसर्गिक सुगंध पसरतो
लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यामध्ये लवंग टोचून ठेवा, हे मिश्रण घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे डास सर्वाधिक असतात
लॅव्हेंडर आणि लेमनग्रास तेल डिफ्यूझरमध्ये (सुगंध पसरवणारे यंत्र) ठेवल्याने घर प्रसन्न राहते
बेकिंग पावडर नैसर्गिकरित्या ओलावा आणि कुबट वास शोषून घेतो
बेकिंग सोडा एका कापडात गुंडाळून कपाटात ठेवा. बेकिंग सोडा एका वाटीमध्ये ठेवून त्याला फ्रिज आणि स्वयंपाकघरात ठेवा
कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा येते
ताज्या फुलांचा सुगंध घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रभावशाली उपाय आहे
कडुलिंब-तुळशीचा सुगंध घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी मदत करतो
कडुलिंब आणि तुळशीच्या पानांना पाण्याने भरलेल्या डिफ्यूझरमध्ये ठेवून स्प्रे करा
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)