अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे अळूवडी

कोणताही सण असो बहुतांश घरात अळूवडी हमखास केली जाते

अळूच्या पानांमध्ये दोन प्रकार असतात वडीची पानं आणि फतपत्याची पानं

हिरव्या देठाच्या अळूच्या पानांपासून बनलेले पदार्थ तयार करताना हाताला खाज आणि घशाला खवखव निर्माण होते

हिरव्या देठाच्या अळूच्या पानांचा वापर भाजीसाठी करतात

ही पाने वापरताना त्यात चिंच किंवा कोकम घालून मिक्स करा, त्यानी खाज कमी होते

काळ्या देठाच्या अळूच्या पानांमध्ये खाजरेपणा खूप कमी असतो

काळ्या देठाच्या पानांचा वापर अळूची वडी बनवण्यासाठी होतो