''या'' देशात वयाची शंभरी ओलांडलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक

बदलत्या जीवनशैलीमुळे अगदी कमी वयातच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे

पण तुम्हाला माहीत आहे का? जगात असेही देश आहेत, जिथे वयाची शंभरी ओलांडलेले नागरिक राहतात

वयाची शंभरी ओलांडलेल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? पाहुयात

जागतिक लोकसंख्येच्या अहवालानुसार, वयाची शंभरी ओलांडलेल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या जपानमध्ये आहे

जपानमध्ये एक लाख 23 हजार 330 नागरिक आहेत, ज्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे

जपाननंतर, अमेरिकेतही वयाची शंभरी ओलांडलेल्या नागरिकांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे

भारतातही शंभरी ओलांडलेले नागरिक मोठ्या संख्येने आहेत