''या'' पद्धतीने ठेवा तुमचा पासवर्ड सुरक्षित
सध्या डिजिटल युग आहे
या डिजिटल युगामध्ये मोबाईल, लॅपटॉपमध्ये कोणतेही ॲप किंवा साईट वापरत असाल तर पासवर्ड अनिवार्य असतो
पासवर्डमुळे तुम्ही तुमची महत्त्वाची माहिती गोपनिय ठेऊ शकता
मात्र तुमचा पासवर्ड एकदम सोपा असेल तर हॅक करणं सहज शक्य होते
तुम्ही तुमचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेऊ शकता? याबद्दल काही सोप्या टिप्स जाणून घेऊया
पासवर्डमध्ये ''123...'', ''abcd'', असे न ठेवता मजबूत पासवर्ड ठेवा
सगळ्या अकाउंट्सना एकच पासवर्ड ठेवणे टाळा
पासवर्ड बदलत राहा आणि पासवर्ड थोडा गुंतागुंतीचा ठेवा