''या'' पद्धतीने करा घरातील प्रदूषण कमी
आजकाल देशातील विविध भागात वायू प्रदूषणचे प्रमाण वाढत आहे
वायू प्रदूषणामुळे आपल्या जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम होतो
परंतु तुम्हाला माहिती आहे? वायू प्रदूषण तुमच्या घरातील हवेतही असते
वायू प्रदूषणामुळे ॲलर्जी आणि श्वसनाचे त्रास वाढू शकतात
परंतु काही सोप्या पद्धतीने घरातील हवा स्वच्छ ठेवता येते
ओल्या कापडाने घरातील फरशी, खिडक्या, इत्यादी पुसल्याने धूळ हवेत उडण्यापासून रोखली जाऊ शकते
कार्पेट आणि फर्निचरला नियमितपणे व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा
बेडशीट, उशांचे कव्हर आणि कापडी वस्तू गरम पाण्यात धुतल्याने धूळ कमी होते
घरातील वस्तूंना नियमित स्वच्छ न केल्याने धूळ जमा होते, त्यामुळे वस्तू नेहमी स्वच्छ ठेवा
खिडक्या-दरवाज्यांतील लहान भेगा बंद केल्याने बाहेरील प्रदूषण घरामध्ये येत नाही
एसी फिल्टर, फॅन आणि किचन चिमणी दररोज स्वच्छ केल्याने धूळ कमी पसरते