हिवाळ्यात कपडे सुकवण्यासाठी ''हे'' उपाय ट्राय करा

हिवाळ्यात कपडे सुकवणे अनेकांसाठी मोठे आव्हान ठरते

थंडीमुळे सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने कपडे लवकर सुकत नाहीत

हिवाळ्यात ओले कपडे तसेच राहिल्याने कपड्यांना कुबट वास येतो

मात्र योग्य जागा निवडल्यास कपडे सुकवण्याची प्रक्रिया सोपी होते

कपडे सुकवण्यासाठी योग्य जागेची निवड करा

घरातील दारात किंवा खिडक्यांजवळ कपडे सुकवल्यास पुरेशी हवा मिळते

किंचीत ओल्या कपड्यांसाठी इस्त्री वापरणे उपयुक्त ठरते

इस्त्रीमुळे कपड्यातील ओलावा पटकन कमी होतो

कपडे दोरीऐवजी हॅंगरवर टांगून ठेवल्याने ते लवकर सुकतात

हॅंन्गर्समध्ये जास्त अंतर ठेवल्याने हवा खेळती राहते

हीटर किंवा एअर ब्लोअरचा (Air Blower) वापरही कपडे सुकवण्यासाठी मदत करतो

एका बंद खोलीमध्ये कपड्यांना रॉड किंवा हॅंन्गरवर लटकवा. यानंतर हीटर किंवा एअर ब्लोअर सुरू करा

बंद खोलीत हीटर चालू ठेवल्यास कपडे वाळण्याची प्रक्रिया जलद होते

यादरम्यान कपडे आणि हीटरमध्ये पुरेसे अंतर ठेवणे आवश्यक असते, अन्यथा ते जळू शकतात