बाथरूममधील कळकटलेली बादली आणि मग अशी करा स्वच्छ
बाथरूममध्ये स्वच्छता कोणाला आवडत नाही?
मात्र बाथरूममध्ये असणारं सामान म्हणजे प्लास्टिकची बादली, मग, सोपकेस, स्टूल हे अनेकदा अस्वच्छ दिसते
रोजच पाण्याच्या संपर्कात येतात त्यामुळे अनेकदा त्यावर घाण साचून एक थर जमा होतो
हे सामान स्वच्छ कसे करायचे आणि हट्टी डाग कसे काढायचे असावा प्रश्न समोर उभा राहतो
यासाठी काही सोप्या ट्रिक्स आपण जाणून घेऊया
बाथरूम क्लिनरच्या साहाय्याने बादल्या, मग, स्टूल हे साफ करण्यास मदत होते
बाथरूम क्लिनरमध्ये असलेल्या रसायनांमुळे सर्व सामान साफ स्वच्छ होऊ शकते
इनो आणि लिंबाच्या मिश्रणानेही प्लास्टिकच्या बादलीवरील पाण्याचे डाग सहजपणे निघून जातात