ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे

ख्रिसमसमध्ये सर्वात जास्त पसंती मिळते ती ''प्लम केक''ला

ख्रिसमस हा सण प्लम केक शिवाय अपुराच आहे

प्लम केक घरच्याघरी तयार करण्याची सोप्पी रेसिपी जाणून घेऊ

200 ग्रॅम मैद्यात 100 ग्रॅम साखर आणि 100 ग्रॅम बटर मिक्स करा

त्यात 50 ग्रॅम ड्राय फ्रूट्स आणि 50 ग्रॅम बारीक केलेला खजूर घाला

1 चमचा बेकिंग पावडर आणि ½ चमचा वेलची पूड मिसळा

मिश्रणात 2 अंडी फोडून परत फेटा

तयार मिश्रण एका केक मोल्डमध्ये ओता

प्रीहीटेड ओव्हनमध्ये (१६० °C) ४५–५५ मिनिटे बेक करा

त्यानंतर बेक केलेल्या केकमध्ये टूथपिक घालून तपासा

टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक तयार झाला

प्लम केक थंड झाल्यावर स्लाइस करा आणि सर्व्ह करा