लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी ''या'' गोष्टी नक्की शिकवाव्यात

पालकांची पहिली जबाबदारी म्हणजे लहान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे

वय वाढताना मुलांच्या शरीरात अनेक बदल घडू लागतात

मुलांना योग्य आणि अयोग्य गोष्टींमधील फरक समजावून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे

हा फरक शिकवल्याने मुलांची नैतिक बुद्धिमत्ता विकसित होण्यास मदत होते

लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी कोणत्या गोष्टी शिकवाव्यात? पाहुयात

चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक पालकांनी लहान मुलांना स्पष्टपणे समजावून सांगावा

आंघोळ किंवा वैयक्तिक मदतीसाठी फक्त आई-वडील किंवा कुटुंबातील विश्वासू सदस्यांकडूनच मदत घ्यावी, हे मुलांना सांगावे

अनोळखी व्यक्ती खाद्यपदार्थ देत असल्यास मुलांनी त्यांच्यापासून दूर राहावे

पालकांनी मुलांना इंटरनेटच्या गैरवापराबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे

अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ही सवय लहानपणापासून मुलांमध्ये विकसित करावी

दरवाज्यावर अनोळखी व्यक्ती आल्यास मुलांनी त्यांना कधीही आत घेऊ नये

संशयास्पद व्यक्ती दिसल्यास मुलांनी त्वरित पालकांना माहिती द्यावी