केसात कोंडा आहे? घाबरु नका हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
आवळा पावडरमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून आंघोळीच्या एक तास आधी केसांना लावा. नियमित वापराने कोंड्याची समस्या कमी होते
आवळ्यात भरपूर विटामिन सी असते त्यामुळे केसांमधील फंगस व कोंडा कमी करण्यासाठी आवळा गुणकारी आहे
नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा त्यामुळे केस मऊ होऊन कोंडा कमी होतो
कोंडा निघत नसेल तर नारळाच्या तेलात कापूर मिसळून दिवसातून 2 वेळा केसांना मालिश करा
तसेच आठवड्यातून 1–2 वेळा कडुनिंबाची पानं टाकलेल्या पाण्याने केस धुल्यास केस निर्जंतुक होतात
ताजे कोरफड जेल थेट टाळूवर लावा, यामुळे खाज आणि जळजळ कमी होते
आठवड्यात 2–3 वेळा केस अँटी-डँड्रफ शॅम्पूने स्वच्छ धुवा