ऑफिससाठी फॉर्मल लूक करायचाय? ‘हे’ लुक्स ठरतील पुरुषांसाठी आकर्षक
आजकाल ऑफिसला जाण्यासाठी महिलांसोबतच पुरुषांसाठीही फॉर्मल लूक ठेवणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे
योग्य पोशाखामुळे तुम्ही आत्मविश्वासू आणि जबाबदार व्यक्ती दिसता
फॉर्मल लूकमुळे तुमची तसेच तुमच्या कंपनीची व्यावसायिक प्रतिमा अधिक चांगली तयार होते
जर तुम्हालाही ऑफिससाठी परफेक्ट फॉर्मल लूक हवा असेल, तर ''या'' टिप्स तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील
गडद रंगाचा सूट: ऑफिससाठी गडद रंगातील (नेव्ही ब्ल्यू, चारकोल ग्रे, ब्लॅक) सूट हा पुरुषांसाठी नेहमीच एक उत्तम पर्याय ठरतो
ब्लेझर आणि फॉर्मल शर्ट: पुरुषांनी ऑफिसला जाण्यासाठी ब्लेझर, फॉर्मल शर्ट, टाय, गडद रंगाची पँट आणि लेदर शूज यांचा कॉम्बिनेशन निवडावा
इस्त्री केल्याने कपड्यांवरील सुरकुत्या निघून जातात आणि लूक अधिक परिपूर्ण दिसतो
ॲक्सेसरीज: साधे पण उठून दिसणारे ॲक्सेसरीज जसे की घड्याळ, चष्मा किंवा बेल्ट यांचा वापर करा
हे तुमच्या फॉर्मल लूकला एक आकर्षक आणि स्टायलिश फिनिश देतात