पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या कुशीतले धबधबे नव्या रुपात खुलून दिसू लागतात.
धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवागार निसर्ग आणि कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
वन डे ट्रिपसाठी मुंबई आणि पुण्याजवळील सुंदर धबधबे कोणते?
काळू धबधबा : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 1200 फूट खोल दरीत कोसळणारा हा भव्य धबधबा आहे.
लिंगमळा धबधबा : सुमारे 600 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
पळसदरी धबधबा : वन डे पिकनिकसाठी पळसदरी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
भिवपुरी धबधबा : मध्य रेल्वेने प्रवास करून अगदी सहज पायी जाता येण्यासारखा हा एक लोकप्रिय धबधबा आहे.
पांडवकडा धबधबा : शहरातील धकाधकीपासून दूर, खारघरच्या डोंगरांमध्ये असलेला हा एक अतिशय नयनरम्य धबधबा आहे.
काळमांडवी धबधबा : 100 मीटर (अंदाजे 328 फूट) उंचीवरून कोसळणारा हा धबधबा ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंगसारख्या खेळांसाठी प्रसिद्ध आहे.
कुणे धबधबा : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा 14 व्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे.