कांदा अन् बटाटा न वापरता झटपट बनवा ''या'' भाज्या
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना जेवण बनवायला पुरेसा वेळ मिळत नाही
तसेच अनेकांना कांदा आणि बटाटा चिरण्याचा देखील कंटाळा येतो
किंवा काहीजण कांदा आणि बटाट्याचे सेवन करणे टाळतात
अशावेळी हलक्या मसाल्यात बनवल्या जाणाऱ्या भाज्या उत्तम पर्याय ठरतात
कांदा-बटाट्याशिवाय टोमॅटो-दुधीभोपळ्याची मिक्स भाजी झटपट तयार करता येते
कांदा नसतानाही भेंडीची रेस्टॉरंट स्टाइल भाजी बनवता येते
टोमॅटो आणि शिमला मिरचीचे वापर करुन पनीर भुर्जी बनवता येते
मेथी मलई मटर ही कांद्याशिवाय केली जाणारी क्रिमी भाजी आहे