थंडीच्या दिवसात अळशीच्या बियांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते
अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे घटक आणि प्रथिने शरीराला ऊर्जा देतात
अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि नैसर्गिक तेलं असतं, जे त्वचेतील कोरडेपणा कमी करते
अळशीमध्ये संपूर्ण फायबर असते, जे हिवाळ्यात होणाऱ्या बद्धकोष्ठतेपासून बचाव करते आणि पचनक्रिया सुधारते
अळशीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडे मजबूत ठेवतात
अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते व जास्त भूकही लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते
अळशीमध्ये असलेले फॅटी ॲसिड घटक केसांचे पोषण करतात, तसेच त्यांची चमक आणि ताकद टिकवून ठेवतात