हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते
त्यामुळे शरीर जास्त कॅलरीज जाळतं आणि भूक वाढते
या काळात शरीरात Ghrelin हा भूक वाढवणारा हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार होतो
त्याच वेळी Serotonin नावाचं हार्मोन कमी प्रमाणात स्रवू लागतं
ज्यामुळे गोड आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढते
थंडीत अनेक वेळा पाण्याचं सेवन कमी होतं, त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊन भूक अधिक लागते
तसंच, हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे Serotonin आणि Ghrelin या दोन्ही हार्मोन्सची पातळी बदलते, ज्याचा परिणाम भुकेवर होतो
याशिवाय, हिवाळ्यात दिवस लहान झाल्याने लोकांची शारीरिक हालचाल कमी होते
त्यामुळे शरीराला ऊर्जा कमी पडते आणि जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)