सावधान! किडनी खराब असल्यास शरीरात दिसतात ''ही'' लक्षणे

बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोक विविध आजारांनी ग्रस्त आहेत

मागील काही काळापासून किडनीचे आजार झपाट्याने वाढत आहेत

किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? पाहूया

किडनी नीट काम न केल्याने शरीरात विषारी पदार्थ साठतात

त्यामुळे थकवा जाणवतो आणि ऊर्जा कमी पडते

नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, किडनीचा आजार ॲनिमिया निर्माण करू शकतो

ज्यामुळे आणखी थकवा येतो आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचण होते

किडनी खराब असल्यास त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते

शरीरात विषारी पदार्थ वाढल्याने झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात

वारंवार जाग येणे किंवा झोप न लागणे हे संकेत असू शकतात

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला डोळ्यांजवळ सूज दिसत असेल, तर ही किडनीसंबंधित समस्या असू शकते

किडनी खराब असल्यास तुमच्या पायांमध्ये आणि टाचांमध्ये सूज येऊ शकते

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)