''हे'' आहेत दररोज भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे; जाणून घ्या

मुंबई: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण पोषक आहारांचे सेवन करतात.

यासाठी अनेकजण विविध आहारांचे सेवन करतात. यात इतर ड्रायफ्रूट्सचाही समावेश आहे.

निरोगी आणि फिट राहण्यासाठी अनेकजण भिजवलेले बदाम खातात.

पण दररोज भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे काय आहेत तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया.

रात्रभर बदाम भिजवून ठेवल्याने त्यातील एन्झाईम इनहिबिटर (enzyme inhibitor) नष्ट होतात. त्यामुळे, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

बदामात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (monounsaturated fats) असल्याने एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

यासह, बदामात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असल्यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते.

तसेच, बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर आहे.

सोबतच, बदामात व्हिटॅमिन-ई आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ऑक्सिडेटिव्ह तणावापासून त्वचेचे संरक्षण होते. सोबतच, त्वचा उजळ आणि तरुण दिसते.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)