पीरियड्समध्ये पोट दुखत असल्यास गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅड वापरून ओटीपोटाला शेक द्या. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात

भरपूर पाणी प्या, कोमट पाण्याने आंघोळ करा आणि हलका व्यायाम किंवा योगासने करा. योगासने केल्याने रक्ताभिसरण सुधारते

गरम पाण्याने पोट शेकवण्यापूर्वी नारळाच्या तेलाने पोटाला हलक्या हाताने मसाज करा

पीरियड्समध्ये पुरेशी विश्रांती आणि झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो

तसेच जिरे-ओवा उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते

रात्री झोपताना हळदीचे दूध प्या. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते

पचायला हलका असणाऱ्या आहाराचा समावेश करा

पीरियड्समध्ये डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरू शकते