पावसाळा सुरू झाला की काहीतरी गरमागरम, कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होतेच
अशा वेळी चीज साबुदाणा वडा हा एक परफेक्ट स्नॅक ठरू शकतो
बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, शिवाय चीजचा लज्जतदार स्वाद प्रत्येक घासाला खास बनवतो
हे वडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात
साबुदाणा 4-5 तास भिजवून निथळून घ्या
त्यात उकडलेले बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, जिरे, मीठ आणि कोथिंबीर मिसळा
मिश्रणाचा गोळा तयार करून लहान गोळे बनवा
प्रत्येक गोळ्यात मोझरेला चीजचा तुकडा भरून त्याला वड्याचा आकार द्या
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा आणि वडे सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
गरमागरम चिझी साबुदाणा वडे दही, हिरवी चटणी किंवा गोड दह्यासोबत सर्व्ह करा