नवरात्रीनिमित्त उपवास करणार आहात? 'या' रेसिपी नक्की ट्राय करा

मुंबई: 22 सप्टेंबरपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला विजयादशमीला संपेल.

या काळात भाविक उपवास करतात.

चला तर जाणून घेऊया नवरात्रीनिमित्त तुम्ही कोणकोणत्या रेसिपी ट्राय करू शकता.

साबूदाणा खिचडी: साबूदाण्याची खिचडी बनवण्यासाठी भिजवलेला साबूदाणा, शेंगदाणा, जिरे, आदीं साहित्य महत्त्वाचे आहेत.

राजगिऱ्याचे लाडू: या रेसिपीसाठी तुम्ही राजगिऱ्याला फुगवून घ्या. तसेच, या रेसिपीसाठी तुम्हाला तूप आणि गूळ आवश्यक आहे.

साबुदाणा वडा: ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, सैंधव मीठ आणि जिरे लागेल.

रताळ्याचे चिप्स: रताळ्याचे चिप्स बनवण्यासाठी तुम्ही रताळ्याचा बारिक स्लाईस करा. नंतर, एका कढईत तेल गरम करून त्यात रताळ्याचे बारिक स्लाईस घाला आणि सोनेरी रंग होईपर्यंत तळा.

वरईचा भात: या रेसिपीसाठी तुम्हाला वरई, तेल किंवा तूप, शेंगदाणे, हिरवी मिरची आवश्यक आहे.

बिटाची कोशिंबिर: बिटाची कोशिंबिर बनवण्यासाठी आधी बीट उकडून त्याला किसून घ्या, तसेच, दही, हिरवी मिरची, कोथिंबिर, आदी सामग्री आवश्यक आहे.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)