शरीराला बळकट आणि मनाला शांत करणारी सोपी योगासनं
योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, तर मन, शरीर आणि श्वास यांचा समतोल. काही सोपी आसने रोज केली, तरी मोठा फरक पडतो.
ताडासन (Mountain Pose) ➡️ शरीर सरळ ठेवा, हात डोक्यावर उचला ➡️ दीर्घ श्वास घ्या ➡️ पाठीचा कणा मजबूत व उंची वाढवायला मदत
वृक्षासन (Tree Pose) ➡️ एका पायावर उभे राहून दुसरा पाय मांडीवर ठेवा ➡️ हात नमस्काराच्या स्थितीत ➡️ संतुलन वाढते, मन शांत राहते
भुजंगासन (Cobra Pose) ➡️ पोटावर झोपा, हात खांद्याजवळ ठेवा ➡️ छाती वर उचला ➡️ पाठीचा त्रास कमी होतो, फुफ्फुसे मजबूत
वज्रासन (Thunderbolt Pose)➡️गुडघे टेकून बसा, हात मांडीवर➡️श्वासावर लक्ष केंद्रित करा ➡️ पचन सुधारते, मन स्थिर होते
बालासन (Child Pose)➡️ गुडघे टेकून पुढे वाका, कपाळ जमिनीवर➡️ हात पुढे लांबवा ➡️ ताण कमी होतो, आराम मिळतो
शवासन (Corpse Pose)➡️ पाठीवर झोपा, हात-पाय सैल➡️ डोळे मिटून श्वासावर लक्ष द्या ➡️ शरीर व मन पूर्णपणे रिलॅक्स
योग ही जीवनशैली आहे. दररोज 15 मिनिटे ही आसने करा आणि निरोगी, ऊर्जावान राहा ''Start Today – Your Body & Mind Will Thank You!''