उन्हाळा वाढला की थंड पाणी पिण्याची इच्छा होते. बहुतेक जण फ्रिजमधील पाणी पितात.
मात्र, अतिथंड पाणी घसा आणि पचनासाठी कधी कधी त्रासदायक ठरू शकते.
अशा वेळी मातीच्या माठातील पाणी पिणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो.
मातीच्या माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड राहते आणि त्यातील गुणधर्म टिकून राहतात.
आयुर्वेदातही या पाण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
माठातील पाणी घसा आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.
माठातील हे पाणी रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
माठातील पाणी पचनक्रिया सुधारून शरीर हलके ठेवण्यास मदत करते.
शरीराचे तापमान संतुलित ठेवून उष्णतेपासून संरक्षण करते.
नैसर्गिक खनिजांमुळे शरीरातील पीएच संतुलन राखण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य ज्ञान प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची हमी देत नाही. आरोग्य प्रथम कोणताही निर्णय पूर्वी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या