दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्या. डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबूपाणी, ताक, नारळपाणी घ्या.
फळे, ताज्या भाज्या, सॅलेड यांचा आहारात समावेश करा. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळा.
हलक्या रंगाचे, सैल आणि कापसाचे कपडे घातल्याने शरीराला थंडावा मिळतो.
सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका.
बाहेर जाताना टोपी, गॉगल, स्कार्फ आणि सनस्क्रीनचा वापरा करा.
दिवसातून किमान एकदा थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने राहते.
घरात पडदे लावून ठेवा; पंखा, कूलर वापरा आणि घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
या टिप्स पाळल्यास उन्हाळ्यातील उष्माघात आणि थकवा टाळता येईल.