रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले.
गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या जोडप्याने 7 वर्षे एकमेकांना डेट केले.
या विवाह सोहळ्याला अत्यंत मर्यादित पाहुण्यांची उपस्थिती होती.
रश्मिका आणि विजय यांनी सकाळी तेलुगू पद्धतीने तर संध्याकाळी कोडावा पद्धतीने लग्न केले.
दोघांनीही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
विजय आणि रश्मिकाने पारंपरिक पोशाख परिधान केले होते.
त्यांच्या या लूकची चांगलीच चर्चा होत आहे.
चाहते सोशल मीडियावर या नवविवाहीत जोडप्याला शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करत आहेत.