Gayatri Datar Engaged: "माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री" गायत्री दातारच्या आयुष्यात एन्ट्री करणारा हिरो कोण?

मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत असताना अभिनेत्री गायत्री दातारने देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे

झी मराठीवरील ''तुला पाहते रे'' या मालिकेमधून गायत्री घराघरात लोकप्रिय झाली

त्यानंतर ''बिग बॉस मराठी'' आणि ''अबीर गुलाल'' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे

अशातच गायत्री दातारने तिच्या प्रेमाची कबूली दिली असून तिने बोटात अंगठी घातल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे

यावेळी तिने कॅप्शन देत लिहल आहे की, "माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीय... माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम दिवसातील काही क्षण शेअर करताना मला खूप आनंद होतोय..."

गायत्रीने तिच्या जोडीदाराची ओळख मात्र गुलदस्त्यातच ठेवली आहे

मात्र गायत्रीचा हा द परफेक्ट पार्टनर नेमका कोण आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे

त्याचसोबत गायत्रीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकार आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे