''गजमुखातून प्रकट होणारा'';सोनाली कुलकर्णीची पर्यावरणपूरक गणपती
मुंबई: गणेश चर्तुथीच्या पार्श्वभूमीवर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही गणरायाचे स्वागत केले.
विशेष म्हणजे, ही मूर्ती सोनालीने स्वत: तयार केली आहे.
तसेच, सोनाली कुलकर्णी दरवर्षी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करते.
सोनालीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टला ''आमचा यंदाचा गणपती - गजमुखातून प्रकट होणारा'' असे कॅप्शन दिले.
यासह, सोनाली कुलकर्णीने सुंदर आणि आकर्षक पद्धतीने डेकोरेशन केले.
गणेश चर्तुथीच्या पार्श्वभूमीवर सोनाली कुलकर्णीने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.