Bharti Singh Second Baby : लाफ्टर क्वीन भारती सिंगने शेअर केली लाडक्या ''काजू''ची पहिली झलक; पाहा हे फोटो
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना 19 डिसेंबर 2025 रोजी दुसऱ्यांदा पुत्रप्राप्ती झाली.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे नाव यशवीर असे ठेवले तर लाडाने त्याला काजू असं म्हटलं जाते.
2022 मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी लक्ष्य ठेवलं असून त्याला सगळे गोला म्हणू लागले
गोलाच्या जन्मानंतर भारतीचे चाहते तिच्या दुसऱ्या बाळाची झलक पाहण्यासाठी आतूर झाले होते.
अखेर भारती आणि हर्ष या दोघांनी त्यांच्या लाडक्या काजूची पहिली झलक चाहत्यांना दाखली आहे.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या संपूर्ण कुंटुंबाचा फोटो शेअर केला आहे.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी कॅप्शनमध्ये लिहले की, "हा आहे आमचा काजू (यशवीर)"