बॉलिवूडची स्टार कलाकार दीपिका पदुकोणचा नवा लूक चर्चेत आला आहे
मुंबईतील ''स्वदेश''च्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये भारतीय कलाकार आणि कारागिरांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
दीपिका आणि रणवीरने नीता अंबाणीच्या ''स्वदेश'' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती
यावेळी दीपिकाच्या लूकने सर्वांच्या नजरा तिच्याकडे ओढल्या गेल्या
तिने परिधान केलेला आकर्षक नवरतन पाटण पटोला अनारकली सूट कुशल कारागीर भवर सिंग यांनी हाताने विणलेला होता
यावर तिने केस एका सुंदर ब्रेडेड लूकमध्ये स्टाईल केले
तसेच लांब, स्टेटमेंट इअररिंग्ज घातले. त्याचसोबत न्यूड मेकअप केला होता
तिचा पोशाख आणि त्यावर साजेशा इअररिंग्जमुळे दीपिका संपूर्ण कार्यक्रमात उठून दिसत होती