भारती आणि हर्ष लिंबाचिया लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

या दोघांनी काही दिवसांपूर्वी युट्युब व्लॉगद्वारे प्रेग्नन्सीची माहिती शेअर केली होती.

नुकतेच भारतीने मॅटर्निटी फोटोशूट केले. तिने आकाशी रंगाचा आकर्षक सिल्क गाऊन परिधान केला होता.

गाऊनवर नेट लेयर असून मोठ्या पांढऱ्या फुलांचे सुंदर डिझाइन होते.

ॲक्सेसरीजमध्ये भारतीने फक्त इअररिंग्स घातले. हेअरस्टाईलही साधी, क्लीन आणि एलिगंट ठेवली होती.

मेकअपमध्ये तिने ब्राऊन लिपस्टिक आणि सॉफ्ट स्मोकी आयज असा नैसर्गिक, हलका लूक निवडला.

फोटोंमध्ये भारती शांतपणे आणि प्रेमाने तिचा बेबी बंप सांभाळताना दिसत आहे.

भारती आणि हर्ष दोघेही लोकप्रिय कॉमेडियन आहेत. आता ते लवकरच दुसऱ्या संततीचे स्वागत करणार आहेत

सध्या भारती ''Laughter Chef Season 3'' चे होस्टिंग करत असून शूटिंग आणि प्रेग्नन्सी दोन्ही उत्तमरीत्या सांभाळत आहे.