Akshay Khanna : अक्षय खन्नाच्या या चित्रपटांतील व्यक्तिरेखाही आहेत हटके!
धुरंधर चित्रपटातील रेहमान डकैत या व्यक्तिरेखेसाठी सध्या अभिनेता अक्षय खन्नाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी आपला मुलगा अक्षय खन्नाच्या बॉलीवूड पदार्पणासाठी १९९७ साली हिमालयपुत्र या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र याच वर्षी आलेल्या बॉर्डर चित्रपटामुळे अक्षयला ओळख मिळाली.
शोमन सुभाष घाई यांनी १९९९ साली आलेल्या ताल या म्युजिकल चित्रपटात अक्षय खन्नाला रोमँटिक हिरो म्हणून प्रेक्षकांसमोर आणले.
फरहान अख्तर यांच्या दिग्दर्शन पदार्पण असलेल्या २००१ मधील दिल चाहता है चित्रपटातील अक्षय खन्ना यांनी साकारलेली सिडची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.
२००२ मधील हमराज आणि २००८ साली आलेल्या अँक्शन थ्रिलर रेस चित्रपटात अक्षय खन्नानं खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना चकीत केले.
अक्षय खन्नाच्या दमदार अभिनयाचं उत्तम उदाहरण म्हणजे २००७ आलेला त्याचा गांधी माय फादर हा चित्रपट. देशातील सर्वात महान व्यक्तीचा मुलगा वैयक्तिक आयुष्य कसं जगला, हे त्यानं मोठ्या पडद्यावर रेखाटलं.
अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर या २०१९ साली आलेल्या चित्रपटात अक्षय खन्नानं संजय बारू या राजकीय विश्लेषकाची भूमिका साकारली.
क्राइम थ्रिलर दृश्यम २ हा २०२२ साली आलेल्या चित्रपटात अक्षय खन्नानं आयजी तरुण अहलावत या पोलिसाची भूमिका साकारली होती.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित २०२५ मध्ये आलेल्या छावा चित्रपटातील औरंगजेब ही भूमिका साकारताना अक्षय खन्नाच्या चेहऱ्यावर त्या व्यक्तिरेखेतील क्रूरता स्पष्ट दिसून आली.