Aishwarya Rai Bachchan : कान्स महोत्सवातील ऐश्वर्या रायच्या दिलखेचक अदा!

आणखी एक वर्ष कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनची दिमाखात एन्ट्री झाला.

ऐश्वर्याच्या या वर्षीच्या लूकसाठी अमित अग्रवाल यांनी ''लुमिनारा'' डिझाइन केली आहे. जी गतिमान प्रकाशाच्या कल्पनेवर केंद्रित असलेली एक कूटूर रचना आहे.

यंदा अभिनेत्रीने गडद नीलमणी रंगाचा गाऊन परिधान केला होता.

हा पोशाख शरीराला घट्ट बसून नंतर एका विशिष्ट मत्स्यकन्येच्या आकाराप्रमाणे पसरत होता.

ऐश्वर्याच्या गाऊनवर असलेली गुंतागुंतीची रेखीय नक्षी लक्ष वेधून घेत होती.

ऐश्वर्याचे केस मऊ आणि एका बाजूला सारलेले होते. तर मेकअप साधा होता आणि संपूर्ण लक्ष गाऊनच्या रचनेवरच केंद्रित केले गेले होते.

दागिनेदेखील त्याच धाटणीचे होते. तिने हिरे आणि नीलम जडवलेला एक शिल्पकृतीसारखा कॉलर नेकलेस घातला होता. जो पोशाखाच्या भविष्यवेधी रेषांशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांना पूरक ठरत होता.