Friday, March 14, 2025 03:13:54 PM

व्हायरल गर्ल मोनालिसाची संघर्षकथा : व्यवसाय ठप्प, पैसेही उधार घ्यावे लागले!

मोनालिसाने सांगितले की, ती प्रयागराजमध्ये माळा विकण्यासाठी गेली होती, पण प्रसिद्धीनंतर मीडियाचा वाढता हस्तक्षेप आणि सततच्या गोंधळामुळे ती आपले काम करू शकली नाही.

व्हायरल गर्ल मोनालिसाची संघर्षकथा  व्यवसाय ठप्प पैसेही उधार घ्यावे लागले

महाकुंभमध्ये सुंदर डोळ्यांमुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसा आता आपल्या मूळ गावी, मध्य प्रदेशातील खरगोन येथे परतली आहे. प्रयागराजमध्ये प्रसिद्धीमुळे आणि युट्यूबर्सच्या सततच्या व्यत्ययामुळे तिने माघार घेतली. मात्र, तिथे तिचा माळा विकण्याचा व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मोनालिसाने सांगितले की, ती प्रयागराजमध्ये माळा विकण्यासाठी गेली होती, पण प्रसिद्धीनंतर मीडियाचा वाढता हस्तक्षेप आणि सततच्या गोंधळामुळे ती आपले काम करू शकली नाही. त्यामुळे तिला आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि घरी परतल्यानंतर पैसे उधार घ्यावे लागत आहेत.

हेही वाचा 👉🏻  महाकुंभातील 'ती' सुंदर तरुणी चित्रपटात काम करणार?

आरोग्याचीही समस्या, पण चित्रपटात जाण्यास इच्छुक!
मोनालिसा सध्या आरोग्याच्या समस्यांमुळे अस्वस्थ आहे. तिचे वडील सांगतात की, तिची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आहे आणि आता ती हळूहळू सुधारत आहे.चित्रपटांमध्ये काम करण्याच्या संधीबद्दल विचारले असता मोनालिसा म्हणाली, “जर कुटुंबाने परवानगी दिली, तर मी नक्कीच चित्रपटात काम करेन!” तिच्या वडिलांनीही सांगितले की, काही निर्मात्यांकडून तिला ऑफर्स आल्या आहेत आणि कुटुंबाने मंजुरी दिल्यास ती मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करू शकते.मोनालिसाने प्रयागराजमध्ये लोकांचे भरभरून प्रेम मिळाल्याचे सांगितले, पण त्याचवेळी सततच्या मीडियाच्या हस्तक्षेपामुळे आणि चाहत्यांच्या गर्दीमुळे तिला त्रासही झाला.

आता मोनालिसा पुढे काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ती चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार का? हे लवकरच स्पष्ट होईल!

हेही वाचा 👉🏻 ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री