जळगाव: जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील महावीर कॉलनीमध्ये घडलेल्या एका घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. या घटनेत एका वृद्ध महिलेने चोरट्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडत आपल्या सोनसाखळीचे रक्षण केले.
मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी त्या वृद्ध महिलेला एकट्या रस्त्यावर गाठले आणि तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेत महिला खाली पडली. मात्र, ती घाबरली नाही. गळ्यातील सोनसाखळी तुटून पडल्यावरही ती तिने घट्ट हातात धरून ठेवली.
त्यातील एक चोरटा मोटरसायकलवरून उतरून सोनसाखळी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, वृद्ध महिलेच्या धाडसाने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. महिलेने आरडाओरड सुरू केल्यानंतर घाबरून चोरटे मोटरसायकलवरून पळून गेले.