Wednesday, April 02, 2025 02:18:02 PM

Amitabh Bachchan Post Viral: 'जाण्याची वेळ झालीय...' चाहते पडले काळजीत!

Amitabh Bachchan Viral Post : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेली सोशल मीडिया पोस्टवर सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पोस्टमुळे चाहते काळजीत पडले आहेत.

amitabh bachchan post viral जाण्याची वेळ झालीय  चाहते पडले काळजीत

Amitabh Bachchan Post Viral : बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांची सोशल मीडियावर पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.
चाहते पडले काळजीत

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. आता त्यांच्या नवीन पोस्टमुळे सर्वजण बुचकळ्यात पडले आहेत. बिग बींसाठी चाहते काळजी व्यक्त करत आहेत.

हेही  वाचा - एकदम फ्री.. ही ऑफर घ्या आणि आयुष्यभर मोफत पाणीपुरी खा.. अजब स्कीमने सोशल मीडियावर धुमाकूळ

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने खळबळ
सुपरस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा चित्रीकरणात व्यस्त असले तरी ते दररोज एक ब्लॉग लिहितात आणि त्यांच्या एक्स हँडलवरून लोकांना आयुष्यातील अपडेट्स देत राहतात. ते ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना चाहत्यांसोबत शेअर करतात. तसेच त्यांचे विचारही शेअर करतात. अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. बिग बींची ही नवीन पोस्ट पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. तर, त्यांचे चाहते अर्धवट वाक्यामुळे काहीच उलगडा होत नसल्याने नाराजही झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Viral Video : टक्कल केल्यावरही किती सुंदर दिसतेय नवरी! धाडसी निर्णय घेत विग घालण्याचं टाळलं; तब्बल 4 कोटी व्ह्यूज

जाण्याची वेळ झालीय...
अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी रात्री एक पोस्ट केली होते. त्यांनी 7 फेब्रुवारी 2025 च्या रात्री 8.34 वाजता त्यांच्या एक्स हँडलवर हे पोस्ट केली. या पोस्टमुळे चाहते सोशल मीडियावर कमेंट करत नक्की काय झालंय याविषयी विचारणा करत आहेत. या पोस्टमुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, 'बिग बी ठीक आहेत ना?' अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, "जाण्याची वेळ आली आहे". ही पोस्ट पाहिल्यानंतर लोक कमेंट करत अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत आहेत.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल

हेही वाचा - Viral Funny Video : गायीसमोर केला डान्स; 'हं.... मला नाही आवडलं..' बघा गायीनं कसं सांगितलं..

असा आहे पोस्टचा अर्थ
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सध्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीच्या सीझन 16 चे होस्टिंग करत आहेत. व्हायरल ट्वीमध्ये बिग बी केबीसी 16 चं शूटिंग पूर्ण करण्यासाठी जाण्याबद्दल बोलत आहेत. बिग बी दर रविवारी त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर पडतात. बिग बी अनेक वर्षांपासून हे करत आहेत. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे.


सम्बन्धित सामग्री