Tuesday, October 08, 2024 01:00:22 AM

Ravindra Chavan | राज्यातील महिलांसाठी 'सक्षम भगिनी योजना' | Marathi News

महिलांना सक्षम करण्यासाठी, सक्षम भगिनी योजनेअंतर्गत १५०० महिला बचत गटांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील प्रत्येक महिला भगिनी सक्षम झाली पाहिजे कारण कुटुंबातील महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते हेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम भगिनी योजना सुरु करण्यात आली आहे. आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेस बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, या योजनेमध्ये पासो नावाची एक कंपनी आहे, जी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रॉडक्ट्स ची फ्रेंचायजी देते, त्या कंपनीशी आम्ही चर्चा करून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. सक्षम भगिनी योजने अंतर्गत डोंबिवलीतील १५०० महिला बचत गटांचे प्रशिक्षण शिबीर नमो रमो नवरात्री या मंडपामध्ये घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये पासो कंपनीसोबत थेट अग्रीमेंट कसे करावे, स्वीगी, झोमॅटो या कंपन्यांसोबत टाय अप करून घरबसल्या महिन्याला १५ ते २० हजार रुपये कसे कमावता येतील याचे प्रशिक्षण बचत गटांना देण्यात आले. १० असे खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेऊन त्यांची ग्राहकांना डिलिव्हरी कशी करता येईल याचे मार्गदर्शन देखील देण्यात आले. १५०० बचत गटांमधील अधिकांश बचत गटांनी आम्हाला हे काम प्राधान्याने करायचे असल्याचे सांगितले. या योजनेमधील प्रमुख फायदा म्हणजे यासाठी बचतगटांना कोणतीही गुंतवणूक करायची गरज नाही. तसेच फ्रेंचायजी घेण्यासाठी सुद्धा एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही. मंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार महिला भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टीने नेहमीच पाऊले उचलताना दिसत आहेत. २ वर्षांच्या कार्यकाळात महायुती सरकारने अनेक योजना आणल्या. यामध्ये महिलांच्या शिक्षणासंबंधी च्या योजना तसेच अनेक वेगवेगळ्या योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केल्या आहेत. मुख्यतः सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या योजनांचा ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे आपण पाहतो. ग्रामीण भागातील महिलांप्रमाणे शहरी भागात राहणाऱ्या महिलांना भगिनींना सुद्धा सरकारी योजनांचा लाभ व्हावा आणि शहरातील महिला भगिनी सुद्धा सक्षम व्हाव्या हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आपण हे पाऊल उचलले आहे.देशातील प्रत्येक भगिनीला सक्षम करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे स्वप्न आहे, ते स्वप्न सक्षम भगिनी योजनेमुळे पूर्ण होईल याची मला पूर्ण खात्री आहे असे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews

Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।

Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi |

----------

Follow Us On :

वेबसाईट - jaimaharashtranews.com

युट्युब - https://www.youtube.com/@JaiMaharashtranews

व्हाट्सअप चॅनेल - https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t

इंस्टाग्राम - https://www.instagram.com/jaimaharashtralive/

ट्विटर - twitter.com/JaiMaharashtraN

Latest Video :

लोकप्रिय आणि व्हायरल YouTube Shorts बघण्यासाठी क्लिक करा...

https://www.youtube.com/@JaiMaharashtraNewsDigitalS-t1r

----------------

Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.


सम्बन्धित सामग्री