Thursday, March 13, 2025 03:38:19 PM

पूर्वी खाद्य तर आता थेट फ्लाइटवर! झोमॅटोच्या सीईओ दीपिंदर गोयल गुंतवले एरोस्पेस स्टार्टअपमध्ये पैसे

झोमॅटोचे सीईओ (Zomato CEO) दीपिंदर गोयल यांनी स्टार्टअपच्या क्षेत्रात मोठे डाव खेळले आहे. झोमॅटोमध्ये (Zomato) गुंतवणूक करून झोमॅटोच्या सीईओ दीपिंदर गोयल यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे.

पूर्वी खाद्य तर आता थेट फ्लाइटवर झोमॅटोच्या सीईओ दीपिंदर गोयल गुंतवले एरोस्पेस स्टार्टअपमध्ये पैसे

सध्या, झोमॅटोचे सीईओ (Zomato CEO) दीपिंदर गोयल यांनी स्टार्टअपच्या क्षेत्रात मोठे डाव खेळले आहे. झोमॅटोमध्ये (Zomato) गुंतवणूक करून झोमॅटोचे सीईओ (Zomato CEO) दीपिंदर गोयल यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. झोमॅटोमध्ये (Zomato) गुंतवणूक केल्यानंतर, नुकताच दीपिंदर गोयल यांनी झोमॅटोच्या माजी सीओओ (Zomato COO) सुरोभी दास यांच्यासोबत एरोस्पेस स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहे. माहितीनुसार, दीपिंदर गोयल आणि सुरोभी दास यांनी LAT एरोस्पेसमध्ये 20 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. झोमॅटोची माजी सीओओ (Zomato COO) सुरोभी दास आणि झोमॅटोचे सीईओ (Zomato CEO) दीपिंदर गोयल यांच्यासमवेत हे एक नवीन स्टार्टअप आहे. सुरोभी दास कंपनीचे कामकाज सांभाळतील तर दीपिंदर गोयल कंपनीच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह भूमिकेत काम करतील.


कंपनी बनवणार छोटी विमाने:

सूत्रांनुसार, दीपिंदर गोयल आणि सुरोभी दास हे दोघेही स्टार्टअपचे संस्थापक असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. पण दीपिंदर गोयल यांचा सहभाग गुंतवणुकीसाठी आणि स्टार्टअपला नॉन-एक्झिक्युटिव्ह भूमिकेत सल्ला देण्यासाठी असेल. LAT एरोस्पेस सध्या 24 आसन क्षमता असलेले कमी किमतीचे छोटे टेकऑफ आणि लँडिंग (STOL) विमान विकसित करण्यावर काम करणार आहेत. ही विमाने प्रादेशिक हवाई संपर्क सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील.


अभियंत्यांची (Engineers) केली जाईल नियुक्ती:

बातमीनुसार, ही कंपनी सध्या 50 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारण्यासाठी चर्चा करत आहे. LAT एरोस्पेस ही कंपनी सध्या एरोडायनॅमिक्स, मटेरियल सायन्स आणि हायब्रीड प्रोपल्शन यांसारख्या क्षेत्रात अभियंते नेमण्याची योजना करत आहेत. 


LAT एरोस्पेसचे उद्दिष्ट:

LAT एरोस्पेसचे उद्दिष्ट ATR आणि Bombardier सारख्या प्रमुख विमान उत्पादकांशी स्पर्धा करण्याचे आहे, ज्यांची विमाने इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या भारतीय विमान कंपन्या वापरत आहेत. 

     सुरोभी दास यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये झोमॅटो सोडले होते. सुरोभी दास यांनी ब्लिंकिटमध्ये काम केले, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म, बाजारपेठांचा विस्तार करण्यावर आणि नवीन श्रेणी जोडण्यावर लक्ष केंद्रित केले. सुरोभी दास झोमॅटोमध्ये एक दशकाहून अधिक काळ होत्या, 2011 मध्ये कंपनीत त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती. सुरोभी दास यांनी गोयल यांच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले होते.


सम्बन्धित सामग्री